Breaking News

पवना धरणातून काढला 75 हजार क्युबिक मीटर गाळ


पुणे, दि. 12, मे - पिंपरी-चिंचवड शहरासह एमआयडीसी, तळेगांव, देहूरोड आणि मावळातील शेतकर्‍यांना पाणीपुरवठा करणा-या पवना धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गाळ काढण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला आहे. 

दोन वर्षात धरणातून 75 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असून त्यामुळे धरणात 45 दिवस पुरेल, इतका अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जल संवर्धनाच्या दृष्टीन सुरू केलेल्या या कामात खा. बारणे यांनी सातत्य ठेवले असून सलग तिस-या वर्षी गाळ काढण्याच्या क ामाची सुरुवात पवना धरण भागात केली. खा. बारणे यांच्या हस्ते तिस-या वर्षी गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.