‘महाभियोग’ विरोधात काँगे्रसची सर्वोच्च न्यायालयात याचिका
नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यासाठी देण्यात आलेली नोटीस फेटाळण्याच्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या निर्णयाविरोधात राज्यसभेच्या 2 खासदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार प्रताप सिंह बाजवा आणि अमी याजनिक यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बाजवा आणि याजनिक यांनीदेखील सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवण्यासाठी देण्यात आलेल्या नोटीसवर स्वाक्षर्या केल्या होत्या. याचिकाक र्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपील सिब्बल काम पाहात आहेत. हे प्रकरण वरिष्ठ न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे आल्यानंतर खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होईल, असे स्पष्ट केले. सिब्बल यांनी न्यायालयाला हेही सांगितले, की या प्रकरणात स्वतः सरन्यायाधीश सहभागी असल्याने ही याचिका सरन्यायाधीश मिश्रा यांच्यासमोर सुनावणीस ठेऊ नये. तसेच महाभियोगाच्या नोटीसमध्ये अनेक संवैधानिक प्रश्न उपस्थित करण्यात आले असून त्यात संविधानाचा अर्थ लावण्याच्या तरतुदीचादेखील समावेश आहे.