हेमंत सूर्यवंशी यांना पुरस्कार प्रदान
कोल्हार : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नाशिक झोनतर्फे जागतिक कामगार दिनानिमित्त दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार सात्रळ येथे उपकेंद्र चालक म्हणून कार्यरत असलेले हेमंत सूर्यवंशी ( श्रीरामपूर विभाग ) यांना नुकताच प्रदान करण्यात आला. यावर्षी नाशिक परिमंडलात एकूण ७२ कामगारांना गौरविण्यात आले. यामध्ये एकूण १३ उपकेंद्र चालक व ५९ वायरमनांचा सन्मान करण्यात आला. महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर आणि अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अनिल गोडसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या पुरस्काराबद्दल श्रीरामपूरचे कार्यकारी अभियंता शरद बंड, देवळालीचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर आदींसह श्रीरामपूर विभाग व कोल्हार-भगवतीपूरमधून सूर्यवंशी यांचे अभिनंदन होत आहे.