पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 4 ठार
पुणे, 03 - पुणे-सातारा महामार्गावर गुरूवारी भीषण अपघातात पुण्यातील चार तरूणांचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी आहे. हे सर्वजण भोर तालुक्यातील चारोळा या गावातील रहिवासी होते.
हे सर्वजण शिरवळ येथून पुण्याकडे परतत होते. त्याचवेळी सातार्याच्या हद्दीतीत वडाप येथे त्यांची जीप सिमेंटच्या कठड्याला धडकल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात जीपमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे, त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.