Breaking News

पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

भगोर, दि. 01, ऑगस्ट - पश्‍चिम बंगालमधील भगोर येथे तृणमूल काँग्रेसचे नेते अशिकुर रेहमान यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. 24 परगणा  जिल्ह्यातील भागोरमधील नाथुंट मार्केट भागात ही घटना घडली. त्यांच्या डोक्याला गोळी लागल्याने रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
झमिन जिविका कमिटीच्या कार्यकर्त्यांनी रेहमान यांची हत्या केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते अराबुल इस्लाम यांनी केला आहे. झमिन जिविका कमिटी तर्फे  रविवारी जुनूस काढण्यात आला होता. त्याचा विरोध करण्यासाठी तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचले असता उसळलेल्या हिंसाचारादरम्यान रेहमान यांची गोळ्या  घालून हत्या करण्यात आली. मात्र, तृणमूल काँग्रेसमधील कार्यकर्त्यानेच ही हत्या केल्याचा आरोप झमिन जिविका कमिटीकडून करण्यात येत आहे.