Breaking News

एलईडी बल्बची किंमत 55 रुपयांवर


नवी दिल्ली, दि.1 - एलईडी बल्बचे वीज बचतीच्या दृष्टीने अनेक फायदे असले तरी भरमसाठ किमतीमुळे सर्वसामान्य गˆाहकांचा कल त्याकडे नसतो. मात्र एलईडीच्या किमतीत मोठी कपात होणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. ‘एलईडी बल्बची खरेदी किंमत 54 रुपये 90 पैशांवर घसरली आहे. 20 महिन्यांपूर्वी 310 रुपये असलेली किंमत 83 टक्क्यांनी कमी झालेली आहे. ही घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे’ असं गोयल यांनी टिवटरवर म्हटलं आहे.
ऊर्जेची बचत करणार्‍या या बल्बची क्षमता सात वॅटसवरुन नऊ वॅटस करण्यात आली आहे.