Breaking News

स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी सहकार्य करा : पिपाडा


राहाता: घरातील ओला आणि सुका कचरा कचराकुंडीतच टाकू, असा निर्धार करुन राहाता शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा केले. प्रभाग क्रमांक आठमधील अंबिकानगर येथे मोठ्या क्षमतेच्या लोखंडी कचराकुंड्या बसविण्यात आल्या. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. 
यावेळी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, लोकसहभागाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. त्यामुळे नगरपालिकेने स्वच्छतेसाठी कितीही प्रयत्न केले तरी जनतेच्या प्रतिसादाशिवाय स्वच्छता होऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांना स्वच्छतेच्या कामात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा. यावेळी राहाता नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती निवृत्ती गाडेकर, अभिजित काळे, भाऊसाहेब भुजबळ, रखमाजी भुजबळ, गोरख पवार आदी उपस्थित होते.