रोबोटिक्स संशोधनात विद्यार्थ्यांना मोठी संधी.
संगमनेर गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण, चारित्र्यवान नागरिक याचबरोबर संशोधनास पूर्ण वाव देणार्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयआयटी मुंबई यांच्या संलग्नतेतून ई-यंत्रा नोडल सेंटर सुरु झाले आहे. या माध्यमातून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
आयआयटी मुंबई यांच्यावतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रॉडक्शन विभागात रोबोटीक्स संशोधनात चालना मिळावी, यासाठी ई-यंत्रा नोडल सेंटरचा शुभारंभ करण्यातआला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. भास्कर बोरकर, केशवराव जाधव, प्रा. विलास शिंदे आदी उपस्थित होते.
या यशाबद्दल माजी महसूल व शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी अभिनंदन केले.