Breaking News

‘रयत’मध्ये काम करावयास मिळणे हे भाग्य : आ. तांबे


सात्रळ कर्मवीरांच्या कार्याचा खरा वारसा थोर स्वातंत्र्यसेनानी कॉ. पी. बी. कडू पाटील यांनी समर्थपणे पुढे चालवला. अशा पावणभूमीत रयत सेवकांना काम करण्याची संधी मिळणे, हे प्रत्येक रयत सेवकाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. एका अर्थाने रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करावयास मिळणे, हे प्रत्येक सेवकाचे भाग्य समजले जाते, असे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.
सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय आणि बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य लालचंद आसावा आणि उपशिक्षक राऊत यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा नुकताच पार पडला. यावेळी आ. डॉ. तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक सहकारी साखर करण्याचे चेअरमन सोपानराव राऊत होते. अध्यक्षीय भाषणात राऊत म्हणाले, कॉ. पी. बी. कडू पाटील यांचा समर्थ वारसा जपणारे व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या रयत संकुलाने गौरवपूर्ण असे शैक्षणिक कार्य केले आहे.

 यावेळी त्यांनी प्राचार्य लालचंद आसावा व उपशिक्षक राऊत यांच्याही शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी माजी विभागीय अधिकारी बी. वाय. शिरसाठ, अण्णासाहेब साबळे, झडे, रयत सेवक संघाचे सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर, पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष भागचंद औताडे, शिक्षक परिषदेचे अप्पासाहेब शिंदे, माजी प्रांताध्यक्ष गोरक्षनाथ बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अशोक गोसावी आणि मंगेश कडलग यांनी केले. पर्यवेक्षक बी. बी. गोसावी यांनी आभार मानले.