Breaking News

हातभट्टी बनविणार्‍या अड्डयावर छापा


जामखेड : शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असुन जामखेड पोलिस स्टेशनला नव्यानेच आलेले पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पहाटे 5.30 च्या दरम्यान एका ठिकाणी हातभट्टीची दारू बनविणार्‍या एका महिलेच्या घरी छापे टाकण्यात आले. या छाप्यामध्ये 67 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जमा करत नष्ट करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी ही दिली. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, 7000 रू किंमतीची दोन वेगवेगळ्या प्लास्टिक ड्रममध्ये 70 लीटर गावठी हातभट्टी तयार दारू अंबट उग्र वास येत असलेली व 60000 रू किंमतीचे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन वेगवेगळे ड्रममध्ये एकुण 1500 लिटर, दारु तयार करण्याचे साधने अंदाजे एकुण 67000 हजार रूपए किमतीचा छापा टाकत या ठिकाणी हातभट्टीची गावठी रसायन व दारू बनवण्याचे साहित्य जमा करून तो नष्ट करण्यात आले.
 
साहित्य, ड्रम्स व हातभट्ट्या वर कारवाई करत नष्ट केल्याया कारवाईदरम्यान जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस हेडकॉ. शबनम शेख, बी. गव्हाणे, पोलीस कॉ. साने, पोलिस कॉ. जाधव, पोलीस कॉ. शेळके यांनी कारवाई केली. जामखेड शहरात विनापरवाना बेकायदा गावठी हातभटटी तयार करून दारू बनवणारे रॅकेट कार्यरत असल्याची खात्रीशीर माहिती असल्याने ही कारवाई करण्यात आली. जामखेड शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय करणार्‍याचे धाबे दणाणले आहेत.