Breaking News

डाळिंब बाग व ठिबक संच जळून भस्मसात


सोलापूर, दि. 07, मे - अज्ञात कारणाने लागलेल्या आगीमध्ये गुळसडी येथील रमेश बोराडे व सुनीता बोराडे यांच्या एकूण डाळिंब 90 आर आणि सीताफळ 1 हेक्टर 89 आर असे एकूण बागेचे क्षेत्र आणि ठिबक सिंचन, पाण्याची मोटार, पाइप, रस्सी व केबल असे साहित्य जळून खाक झाले आहे. 

त्याचबरोबर या लागलेल्या आगीमध्ये गुळसडी शिवारातील आसपासचा एकूण 50 ते 60 एकर माळरान क्षेत्र जळून खाक झाल्याची माहिती रमेश बोराडे यांनी दिली. या घटनेचा पंचनामा करून झालेले नुकसान शेतकर्‍यास मिळवून देण्याचे आदेश करमाळा तालुक्याचे तहसीलदार यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.