Breaking News

मोरबे धरण 100 टक्के भरले

नवी मुंबई, दि. 02, सप्टेंबर - नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारं मोरबे धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे आता वर्षभरासाठी नवी मुंबईकरांचा पाणी प्रश्‍न सुटला  आहे. दररोज 450 एमएलडी पाणी पुरवठा करण्याची क्षमता असणार्‍या या धरणातून नवी मुंबईला दररोज 250 एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो. 88 मीटर  इतकी या मोरबे धरणाची खोली असून मुसळधार पावसामुळे हे धरण आता काटोकाट भरलं आहे. नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी धरणाची पाहणी  करून जलपूजन केलं. त्यांच्याच हस्ते धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण भरलं आहे.  यामुळे आता नवी मुंबईकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्‍न सुटला असल्याचं महापौरांनी सांगितलं. आता लवकरच पाईपलाईनचं काम करून 24 तास पाणीपुरवठ्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केलं.