शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यातील 21 मतदान केंद्रे
जळगाव, दि. 12, मे - विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची होवू न घातलेल्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातील 21 मतदान केंद्र प्रस्तावित केले आहेत. तालुका निहाय मतदान केंद्र, अमळनेर- तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय आणि राजसारथी सभागृह, चोपडा- तलाठी मिटींग हॉल, तहसिल कार्यालय, यावल- तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय, रावेर- संजय गांधी योजना शाखा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नविन तहसिल कार्यालय, मुक्ताईनगर- तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय, बोदवड- सभागृह तहसिल कार्यालय, भुसावळ- डी. एस. हायस्कूल, भुसावळ पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडील खोली क्र.2 आणि डी. एस. हायस्कूल, भुसावळ पूर्वेकडील उत्तर दक्षिण इमारत, उत्तरेकडील खोली क्र. 3, जळगाव- आर.आर. विद्यालय, पूर्व-पश्चिम इमारत, खोली क्र. 6, आणि आर. आर. विद्यालय, पूर्व-पश्चिम इमारत, जिमखाना टेनिस रुम जवळील खोली क्र. 13, भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यामंदिर, पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडून खोली क्र. 2, भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यामंदिर पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडून खोली क्र.4, धरणगाव- तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय, एरंडोल- तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय, पारोळा- मिटींग हॉल तहसिल कार्यालय, भडगाव- तहसिलदार यांचे दालन तहसिल कार्यालय, चाळीसगाव- नानासाहेब वाय. एन. चव्हाण क ला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव पूर्वेकडील उत्तर-दक्षिण इमारत उत्तरेकडील खोली क्र.3 आणि नानासाहेब वाय. एन. चव्हाण कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव पूर्वे कडील उत्तर-दक्षिण इमारत उत्तरेकडील खोली क्र.5, पाचोरा- तहसिलदार यांचे दालन तहसिल कार्यालय, जामनरे- जि.प.प्राथमिक शाळा मेन हॉल, वाकी रोड, जामनेर असे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी शिक्षक मतदार संघ नाशिक विभाग किशोर राजे निंबाळकर यांनी माहिती दिली आहे.