Breaking News

शेतकर्‍यांनी आधुनिक पद्धत अवगत करावी ः रामदास दरेकर


सुपा : पंचायत समिती सभागृह पारनेर येथे किसान कल्याण कार्यशाळा कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा व तालुका कृषी अधिकारी, पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी सांगितले की, दुुष्काळी समजल्या जाणार्‍या तालुक्यात काही वर्षात अमुलाग्र बदल झाला असून एप्रिल, मे महिन्यात शेतात पाण्याचा योग्य पद्धतीने विनियोग व्हावा यासाठी शेतकर्‍यांनी अधुनिक पद्धत अवगत केल्यास शेतातील उत्पादन व पाण्याची बचत होईल.


यावेळी कार्यक्रमात शेतकर्‍यांना तंत्रशुध्द शेती, आधुनिक शेती, प्रगतशील शेतकर्‍यांचे अनुभव सांगण्यात आले. यावेळी व्ही. के. बाभळेश्‍वर, सुरेश जगताप उपप्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर, रामाकृष्ण जगताप, पंचायत समिती कृषी अधिकारी, देवेंद्र जाधव ता.तं.व्य. पारनेर, विनायक लगड प्रगतशील शेतकरी, बाळासाहेब कारखीले, राजाराम गाजरे, दिपक खंदारे आदी कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.