Breaking News

महिलेस विजेचा शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न


श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथे इलेक्ट्रिक मोटरीच्या स्टार्टर मधील वायर खाली सोडून महिलेस विजेचा शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न घडला. याप्रकरणी महिला शेतकरी साक्षी श्रीकांत भोस यांच्या फिर्यादी वरून दोघांविरोधात श्रीगोंदे पोलिसांत गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

साक्षी या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीवरील कृषिपंप सुरू करण्यासाठी गेल्या असता सुनील भोस, सुधीर भोस यांनी संगनमत करून या विहिरीवरील कृषी पंपाला वीज पुरवठा करणारे स्टार्टर मधील वायर काढून खाली टाकल्या होत्या, या वायरमधील विद्युत प्रवास लावून इजा, दुखापत होईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. याच वेळी साक्षी भोस या विहिरीवर गेल्याने सुदैवाने त्यांनी या खुल्या वायर पाहिल्याने दुर्घटना टळली.