Breaking News

‘आत्मा मालिक’तर्फे दिंडी आणि सत्संग


कोपरगाव : येथील आत्मा मालिक ध्यानपीठाच्यावतीने प. पू. आत्मा मालिक सानिध्यात अधिकमासाच्या महान पर्वावर आश्रम ते आळंदी, पुणे व पंढरपूर येथे २३ ते २६ मे या दरम्यान दिंडी सोहळा पार पडणार आहे. 

या दिंडी सोहळयासाठी आश्रमाच्यावतीने ४० बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या दिंडीमध्ये ५ ढोलपथक, १५ रथ यांचा समावेश आहे. बुधवारी {दि. २३} सकाळी १० वा. कोकमठाण येथून दिंडीचे प्रस्थान होऊन सायंकाळी ५ वा. आळंदी येथे संजीवनी समाधी दर्शन व सत्संग कार्यक्रम होणार आहे. दुस-या दिवषी आळंदी वरून पुणे येथे दुधाने लॉन्स पुणे येथे सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर कार्यक्रमानंतर दिंडी पंढरपूरकडे रवाना होईल. पंढरपूरला विठूमाऊलींचे दर्शन घेऊन काल्याच्या किर्तनाने या दिंडी सोहळयाची सांगता होईल. या दिंडी सोहळयासाठी बसव्यवस्थेबरोबरच निवास व भोजन व्यवस्था आश्रम व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आलेली आहे. या सोहळयाच्या आयोजनासाठी व्यवस्थापक हिरामण कोल्हे, सर्व विभागाचे प्राचार्य, जनसंपर्क विभागाचे योगेश गायके व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.