Breaking News

बालाजी देडगावची ग्रामसभा खेळीमेऴीत


नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेली ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सर्वप्रथम सरपंच स्वाती चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तसेच यावेळी प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने गौरव करण्यात आला. 

यानंतर सरपंच स्वाती मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरकारी जमिनीचे बंद केलेले 8 अ उतारे परत मिळवूण देण्यास मोलाचे योगदान देणारे अरुण मिसाळ यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर ऑनलाइन उतारे सेवेचा शुभारंभ कामगार तलाठी अजित कोेकणे यांच्या हस्ते पत्रकार बन्सीभाऊ एडके यांना ऑनलाइन उतारा देऊन करण्यात आला. यावेळी माजी सरपंच बाजीराव मुंगसे, कडुभाऊ तांबे, चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच लक्ष्मण गोयकर, दत्ता मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे, सचिन मुंगसे, अभिजीत ससाणे, अशोक तांबे, अशोक मुंगसे, सखाराम गोफणे, अनिकेत मुथ्था ,जालिंदर खांडे, निलेश कोकरे , काशिनाथ टकले आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी एस.एस.शेलार यांनी गावातील चालू असलेल्या विकास कामाबाबतचा आराखडयाचे वाचन केले. तसेच यावेळी विविध विषयावर खेळीमेऴीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस दलात सहभागी झालेले टकले व गोफणे तसेच प्रशासकीय सेवेत दाखल झालेले सोमनाथ देवकाते यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, विज वितरण कर्मचारी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.