Breaking News

बेलपिंपळगाव ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवकावर मनमानी कारभाराचा आरोप


नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे 2 मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी या सभेचे अध्यक्ष सरपंच शारदा औटी या होत्या . सकाळी 11 वा ग्रामपंचायत कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक विकास कामावर चर्चा सुरू असतांना अनेक ग्रामपंचायत सदस्य गैरहजर होते. यावेळी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचन करून सांगितले , सभा सुरु झाल्या पासून वादळी विषयाला सुरुवात झाली प्रथमच ग्रामसभेत उपसरपंच दीपक चौगुले यांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी कारभार करतात कोणाला विश्‍वासात घेऊन विकास कामे करत नाही अव्वाच्या सव्वा भावात कामाची बिल काढत असून कोणाला ही याची माहिती दिली जात नाही त्यामुळे कामावर,व खर्चावर उपसरपंच दीपक चौगुले यांनी अविश्‍वास आणला , तंटामुक्ती उपाध्यक्ष सुभाष साठे यांनी देखील गावातील स्वस्त धान्य दुकान व रॉकेल घेतांना गावातील सर्वसामान्य लोकांच्या खिशाला मात्र मोठ्या प्रमाणात कात्री लागत असून यावर योग्य ते नियंत्रण ठेवण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात आली पाहिजे व जनतेची होणारी लूट बंद करण्यात यावी अशी मागणी केली.

संभाजी ब्रिगेडचे गणेश चौगुले यांनी देखील सरपंच व ग्रामसेवक यांना विकास कामावरून चांगलेच धारेवर धरले होते. कोणताही गावाच्या हिताचा निर्णय न घेता ग्रामसभा नुसती नावापुरती घेत असून यातून मार्ग निघू शकत नाही असे देखील त्यांनी सांगितले .ग्रामस्थ वारंवार ग्रामसभा ही गावातील श्रीराम मंदिराच्या सभामंडपात घ्यावी अशी मागणी असते परंतु सरपंच व ग्रामसेवक गावाच्या तोंडी मागणीला जुमानत नाही, गावाच्या विकास कामांचे प्रस्ताव पाठवण्याचे काम देखील करतांना कामात कसूर करत आहेत, गावातील तरुण होतकरू शिक्षित यांच्यासाठी गावात शॉपिंग कॉम्प्लेक्स गरज आहे, बाजार तळावर बाजार करू साठी ओटे बांधण्यात यावे , तरुण पिढीला व्यायाम शाळा गरज असून या मागणीला कायमच केराची टोपली दाखवली जाते अशा अनेक कामावर लक्ष देण्यात यावे अशी अपेक्षा नागरिक करत आहे. परंतु सरपंच व ग्रामसेवक हे काम करण्यासाठी आडकाठी आणतात असे उपसरपंच दीपक चौगुले यांनी आरोप केला . 

आरोप प्रत्यारोप सुरु असतांना सभा संपली असे सांगताच सरपंच यांनी ग्रामपंचायत मधून काढता पाय घेतला यावर अनेकांनी नाराजीचा सूर काढला यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच राजेंद्र साठे , माजी सभापती वसंत रोटे, तंटामुक्ती उपाध्यक्ष सुभाष साठे, कृषी अधिकारी गायके, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ नजन, जि. प. प्राथमिक शाळा मुख्याध्यापक , आरोग्य सेवाच्या डॉ न्यालपल्ली , अंगणवाडी सेविका, विजय सुरसे, भीमराज सुरसे, कांतीलाल गटकळ, अशोक साठे, मुक्ताबाई राऊत, गुलाब पठाण, दत्तात्रय राऊत, भाऊसाहेब पुंड, प्रशांत साळुंके, रेवनाथ कांगुणे, यासह अनेक ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते.