पारनेर महाविद्यालयाने गुणवत्ते बरोबरच जपली सामाजिक बांधिलकी
टाकळी ढोकेश्वर / वार्ताहर ।शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान नव्हे तर, सामाजिक प्रगल्भतेची जाणीव करून परिपुर्ण नागरिक घडविण्याचे काम पारनेर महाविदयालयातुन घडत असल्याचे प्रत्यंतर आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील पुणेवाडी गावाने पाणी फाउंडेशन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व काम सुरू केले. ग्रामस्थ ही झटून कामाला लागले मात्र, त्यांच्या कामाला साथ दिली. पारनेर महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुमारे शंभरहून अधिक शिबीरार्थींनी तब्बल आठ दिवस हे शिबीरार्थी राबले अन् चार हजार घन मिटर समतल चर डोंगरावर त्यानी पुर्ण केले. सुमारे सातशे ऐंशी टँकर पाणी म्हणजे कोटी लिटर पाणी जमिनीत जिरवण्यास मदत होईल, त्याचबरोबर पाणी पातळी वाढवण्यास मदत होऊन गाव पाणीदार होईल. युवकांच्या या श्रमदानाने ग्रामस्थही भारावले. सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि पारनेर महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य तुकाराम थोपटे यांच्यासह सरपंच बाळासाहेब रेपाळे, चेअरमन बाबासाहेब रेपाळे, माजी सरपंच सुहास पुजारा, प्रा. तुषार चिकने, प्रा. हरीष शेळके, प्रा. प्राजाक्ता तनपुरे, प्रा. गणेश रेपाळे, प्रा. रणजीत शिंदे, प्रा. प्रियंका मिसाळ, प्रा. नूतन मांडगे, विद्यापीठ प्रतिनिधी मयुर ठाणगे, वर्षा भाईक, शितल मते, पुजा भोसले, वृषाली आहेर, निलेश खैरे यानीही प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग नोंदवुन गाव पाणीदार करण्याचा संकल्प केला.