Breaking News

ज्याच्यावर केला होता बलात्काराचा आरोप, त्याच्याशी तुरुंगात जाऊन केले तरुणीने लग्न

जमुई | बिहारच्या जमुई तुरुंगात सोमवारी एक अनोखे दृश्य पाहण्यास मिळाले. न्यायालयाच्या अादेशानंतर तुरुंगात असलेला कैदी व बलात्कार पीडितेचे लग्न लावून देण्यात आले. यासाठी तुरुंग प्रशासनाने तयारी केेली होती. तुरुंगातील मंदिरात हिंदू रीतिरिवाजानुसार बलात्कार पीडिता व आरोपी व्यास पांडे यांचे लग्न लावून देण्यात आले. हे प्रकरण तीन वर्षांपूर्वीचे आहे.