Breaking News

साखर कामगार रुग्णालयास १ लाख रुपयांची देणगी!

श्रीरामपूर प्रतिनिधी - येथील साखर कामगार रुग्णालयात रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळत असल्याचा अनुभव आल्याने दंडापूर कुटुंबियांने तब्बल १ लाख रुपयांची देणगी दिली. येथील निवृत्त विद्युत अभियंता स्व. वसंतराव दंडापूर यांच्यावर या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यांची पत्नी श्रीमती शालिनी दंडापूर यांच्या आग्रहानुसार त्यांचे पुत्र मुळा प्रवरा संस्थेचे अभियंता राजेंद्र आणि योगेंद्र दंडापूर यांनी यासाठी पुढाकार घेतला. या रुग्णालय ट्रस्टचे विश्वस्त अविनाश आपटे यांच्याकडे ही देणगी सुपूर्द करण्यात आली. 

साखर कामगार रुग्णालय सेवाभावात उत्तर नगर जिल्ह्यात नावजलेले आहे. या रुग्णालयास शासनाच्यावतीने गेली अनेक वर्षांपासून अनुदान मिळत नाही. साखर कामगारांचे आर्थिक सहाय्या, सेवाभावी लोकांची आर्थिक मदत आणि रुग्णालयात आलेल्या काही रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांकडून मिळत असलेल्या देणगीतून या रुग्णालयाचे कामकाज चालीवले जाते. दंडापूर परिवाराने या रुग्णालयात मिळालेली वैद्यकीय सुविधा, येथील डॉक्टरांसह त्यांच्या सहकाऱ्यांची रुग्णांना नेहमी मदत मिळत असल्याचे पाहिले. हा भाव पाहूनच या कुटुबियांनी देणगी दिल्याचे अभियंता राजेंद्र दंडापूर यांनी सांगितले. दरम्यान, सेवाभावी आणि दानशूर लोकांकडून मिळत असलेल्या देणगीतून या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांवर उपचार केले जातात, असे आपटे यांनी सागितले. शहरातील दानशूर व्यक्तीमुळेच हॉस्पीटल सुसज्ज झाले असल्याचे ते म्हणाले.