फोटोग्राफर सामाजिक संस्थेची बैठक खेळीमेळीत
राहुरी विशेष प्रतिनिधी : तालूका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या संचालकांसह उर्वरित पदांची निवड नुकतीच सर्वानुमते करण्यात आली. यासाठी येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आढा होते.
यावेळी अध्यक्ष कुलदिप नवले, उपाध्यक्ष ईश्वर लाहारे, माजी अध्यक्ष बाळासाहेब मुसमाडे, ज्येष्ठ फोटोग्राफर जालिंद्र मुसमाडे, सतिश कोबरणे, भारत दिघे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी राहुरी तालुक्यातील असंख्य फोटोग्राफर उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव गणेश नेहे यांनी केले. अध्यक्ष कुलदिप नवले यांनी आभार मानले.