Breaking News

’स्मार्ट संचालकां’ना अखेर अंमलजावणी समितीत प्रवेश


पुणे, दि. 2, मे - स्मार्ट सिटीच्या कामाला गती देण्यासाठी स्थापन केलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीमध्ये मनसेचे सचिन चिखले व सेनेच्या प्रमोद कुटे या दोन्ही संचालकांना डिच्चू देत सत्ताधारी भाजपने कुरघोडी केली होती. मात्र, त्यावरून आरोप झाल्यानंतर अखेर या दोघांना या समितीत घेण्याचा निर्णय स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. स्मार्ट सिटी संचालक मंडळाचे अध्यक्ष व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीची बैठक महापालिका आयुक्तांच्य दालनात पार पडली. बैठकीला महापौर नितीन क ाळजे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

केंद्र, राज्य शासनाच्या अधिका-यांना बैठकीला येत स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकांना विलंब होऊन निर्णय प्रक्रिया रखडते. मात्र, प्रकल्पाला गती देण्यासाठी स्थानिक संचालकांची प्रकल्प अंमलबजावणी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्या प्रमाणे समिती स्थापन करून त्यात संचालकांपैकी आयुक्त, महापौर, स्थायी समिती, सत्तारुढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते यांचा समावेश क रण्यात आला. मात्र, स्थानिक संचालकापैकी सचिन चिखले व प्रमोद कुटे यांना डिच्चू देण्यात आला होता. त्यानंतर सत्ताधा-यांनी ही कुरघोडी करत निर्णय प्रक्रियेपासून बाजुला ठेवल्याचा आरोप होऊ लागला होता. त्यामुळे अखेर या दोघांनाही प्रकल्प अंमलबजावणी समितीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक सत्ताधारी व विरोधी संचालकांपैकी सर्व संचालकांचा आता या अंमलबजावणी समितीत समावेश झाला आहे.