Breaking News

प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील च्यार विद्यार्थ्यांची मॅकडॉल्स फार्मासुटिकल्स कंपनीत नोकरी साठी निवड


प्रवरानगर दि . २७ मे :  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथिल औषधनिर्माणशास्र महाविद्यालयामध्ये मॅकडॉल्स फार्मासुटिकल्स प्रा. लि . या कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्हिव मध्ये इन्स्टिट्युट ऑफ  फार्मसी या महाविद्यालयातील च्यार विद्यार्थ्यांची निवड केली असून हे विद्यार्थी  या नामांकित कंपनीत रुजू होतानाच त्यांना दिड लाख रुपयांचे प्याकेज देण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य दत्तात्रय थोरात यांनी दिली.

या मध्ये राहुल वाडेकर ,ऋषिकेश गुंजाळ, अनिकेत भाग्यवान आणि विजय कोळेकर या विद्यार्थ्यांचा समावेश असून  या विद्यार्थ्यांची मॅकडॉल्स फार्मासुटिकल्स प्रा. लि . या कंपनीमध्ये प्रॉडक्शन या विभागात निवड झाली आहे. त्यांना ट्रेनींग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. आर.बी.कोते, प्रा. व्ही .पी. आरगडे,प्रा. ए. व्ही .राजदेव,प्रा.एस.एस.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या विद्यार्थ्यांचे  राज्याचे विरोधी पक्षनेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे,सहसचिव भारत घोगरे ,शिक्षण संचालक डॉ हरिभाऊ आहेर,  आणि शिक्षकांनी  अभिनंदन केले.