Breaking News

अक्षय अनभुले यांची विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती


श्रीगोंदा :- श्रीगोंदा येथील श्री. अक्षय सुनिल अनभुले यांची विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष श्री. अजिंक्यराणा पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. अक्षय अनभुले हे बी. ई.कॉम्प्युटर आहेत. विद्यार्थी चळवळीत ते नेहमी सक्रीय असतात. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.

अक्षय अनभुले यांच्या निवडीबद्दल विद्यार्थी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, ऋषिकेश गायकवाड , हरिदास शिर्के, अख्तर शेख, प्रा. तुकाराम दरेकर, आ. राहुल जगताप, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, अजितदादा पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.