निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे मोफत पाणी वाटप
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने मोफत पाणी वाटप करण्यात आले. दरम्यान, अकार्यक्षम पदाधिकारी, लबाड प्रशासनाविरोधात ढाकळी ढोकेश्वर येथील महिला आज पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात गावोगावी पिण्याचे पाणी वाटप करण्याचे समाजोपयोगी कार्य पार पडत आहे.
टाकळी ढोकेश्वर शहरात आज सकाळी पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो महिला मोकळे हांडे घेऊन रस्त्यावर उतरतल्या. विकासाच्या वल्गना करणाऱ्या पुढाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडला, अशी चर्चा टाकळी ढोकेश्वर येथील माताभगिणींमधून ऐकायला मिळाली. मात्र निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने दररोज टाकळी ढोकेश्वर शहराला किमान ५ टँकर पाणी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, टँकरद्वारे पाणी वाटप कार्यक्रमाचे उदघाटन आज लोकनेते निलेश लंके यांच्या हस्ते पार पडले. लंके यांनी स्वतःच्या हाताने पाणी वाटप करत हे समाजकार्य अखंडित सुरु ठेवा, असे कार्यकार्यांना सूचित केले. स्वखर्चाने हा उपक्रम राबविल्याबद्दल लंके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, युवा नेते सुहास बांडे, बाळासाहेब खिलारी, विश्वनाथ बांडे, पोपट गुंड, महेश झावरे, आनंद झावरे, सिध्देश खिलारी, पत्रकार शरद झावरे, दत्ता निवडूंगे आदींसह बांडेमळा परिसरातील अनेक माताभगिणी आदींसह निलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.