Breaking News

साईसंस्थानच्या उत्कृष्ट नियोजनामुळे पाणी टंचाई गायब!

शिर्डी / किशोर पाटणी - साईबाबा संस्थानच्या जमिनीवर महेंद्रा अॅण्ड महेंद्रा उद्योग समुहाने सामाजिक बांधिलकी आणि साईभक्ताचे हित या दृष्टिकोनातून तलाव बांधून दिला आहे. या तलावामध्ये साई संस्थानने ताडपत्री टाकल्यामुळे पाण्याची गळती थांबली. परिणामी पाणी टंचाई गायब झाली आणि यावर्षी साईभक्तांची सोय झाली. 

जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत जवळपास अडीच कोटी खर्चून ४२ कोटी लिटर क्षमतेचा हा तलाव साईभक्तांसाठी ‘जीवन’ ठरला आहे. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष, सर्व विश्वस्त आणि कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल हे सर्व या यशाचे मानकरी आहेत. साईसंस्थानकडे यापूर्वी तीन तलाव होते. महेंद्रा उद्योग समुहाने बांधून दिलेल्या तलावासह चारही तलावात ३ कोटी ११ मिलीलिटर पाणी क्षमता आहे. या तलावाची गळती रोखल्यामुळे साईसंस्थानला यावर्षी इतक्या कडक उन्हातही फारशी पाणी टंचाई जाणवली नाही. साईसंस्थान परिसरात भक्तांची गर्दी कमी असेल तर ४० लाख लिटर तर जास्त गर्दी असेल तर ४५ लाख लिटर पाण्याची गरज असते. साईसंस्थानला दारना धरणातून पाणी मिळते. यातून साईसंस्थान कनकुरी आणि पिपंळवाडी या गावांना पाणी देत असते. संस्थान रोटेशन मिळाल्यानंतर ९० दिवसांपर्यंत पाणी पुरवते. याच तलावातून १ हजार ५०० रुम, मेघा धर्म शाळा १ व २, हाॅस्पिटल द्वारावती, भोजनालय, संस्थानचे कामगार आदींना पाणी पुरवठा केला जातो. संस्थानचा जलशुद्धीकरण प्रकल्प २६ वर्ष जुना आहे. त्यातून २४ तासात ४० लाख लिटर पाणी शुद्ध होते. या प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.