Breaking News

पोलिसांच्या भीतीने चोराने घेतले डोके फोडून


राहुरी : शहरातील प्रकाश पारख यांच्या घरात घुसलेल्या चोराला पारख यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या चोराने पोलिसांच्या भितीने त्याने मद्यधुंद अवस्थेत डोके फोडून घेतले. दरम्यान, चोराच्या मामाने त्याला घटनास्थळावरुन पळून लावल्याची घटना नुकतीच घडली

{दि. ९} सकाळी राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांच्या गोकूळ काँलनी येथील घरात मद्यधुंद अवस्थेत असलेला एक भामटा चोरीच्या उद्देशाने घरात घुसला. पहिल्या मजल्यावरुन चाव्यांचा जुडगा घेऊन तो दुसर्या मजल्यावर गेला. सामानाची चकापाचक सुरु केली. हा प्रकार पारख कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांनी त्या भामट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो घरातून पळून गेला. यावेळी प्रकाश पारख व आणखी काही लोकांनी त्याचा पाठलाग केला असता तो भामटा तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू कार्यालया जवळ लपून बसला. प्रकाश पारख यांनी सदर भामट्याला पकडले असता तो राहुरी शहरातील असून त्याचे नाव शशिकांत भिमराज गूंजाळ असल्याचे समजले. 

पारख यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देत असतांना सेतू कार्यालयातील त्याचा मामा अनिल शिंदे याने पारख यांना दमदाटी, धक्काबुक्की करत भाचा असलेल्या चोराला पळवून लावले. दरम्यान, भामटा शशिकांत गूंजाळ याने स्वत:चे डोके फोडून घेत गोंधळ घालत घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी प्रकाश पारख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शशिकांत भिमराज गूंजाळ व अनिल शिंदे या मामा-भाचाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील याचा तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक गायकवाड हे करीत आहेत.

**