भारतात सर्वप्रकारच्या निर्मितीसाठी मोठी संधी - मोहिनी केळकर
पुणे, दि. 07, मे - भारत हा विकसनशील देश आहे. उत्पादनात उच्च वाढीच्या क्षेत्रांपैकी एक म्हणून हा देश उदयास आला आहे. जागतिक नकाशावर एक औद्योगिक केंद्र म्हणून भारताला स्थान देण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी सर्वप्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे मत ग्राईड मास्टर मशीन कंपनीच्या संचालिका मो हिनी केळकर यांनी व्यक्त केले. एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर येथे एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि इंडियन मशीन्स टूल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयएमटीएमए) यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित इंडस्ट्री अकॉडमिक कॉन्क्लेव्ह 2018 या कार्यक्रमात मोहिनी केळकर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
ग्राईड मास्टर मशीन कंपनीच्या संचालिका मोहिनी केळकर म्हणाल्या की, भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) वाटा वाढत आहे. निवडक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये अधिक वाढीसाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात संधी आहे. जागतिक मॅन्यूफॅक्चरिंग लँडस्केप डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे बदलली जात आहे. भविष्यात इंटरनेट ऑफ चीज आणि रोबोटिक्स एक त्रितपणे चौथे औद्योगिक क्रांती किंवा इंडस्ट्री 4.0 म्हणून ओळखले जाणारे तंत्रज्ञान विकसीत होत आहे. प्रचंड कार्यक्षमता आणि गुणवत्तेवर अवलंबून असलेल्या हे तंत्रज्ञान भविष्यात जगातील बाजारपेठा आपल्या नियंत्रणाखाली आणेल. भारतात नवनिर्मितासाठी पायाभूत सुविधांचा अभाव असला तरी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून येथील विद्वान तरूण नवनिर्मिती करताना दिसत आहे.