Breaking News

एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अशोक मते यांना कांस्य पदक


पुणे, दि. 07, मे - उदयपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रचे अध्यक्ष अशोक मते यांनी मास्टर्स गटात कांस्य पदक मिळविले. एशियन स्पर्धेत मते यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. जगभरातील बारा देशांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. अशोक मते हे मागील अनेक वर्षापासून पॉवर लिफ्टिंग या खेळात पारंगत आहे. 

राज्य तसेच देश पातळीवरील अनेक स्पर्धामध्ये त्यांनी विजयश्री प्राप्त केल्यानंतर जागतिक स्थरावरील एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेकरिता त्यांची निवड झाली होती. या स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनि धित्व करताना कांस्य पदकाची कामगिरी करत मते यांनी लोणावळा शहराचा नावलौकिक जागतिक स्तरावर उंचावला आहे.