आंतरराष्ट्रीय शिल्पकार प्रमोद कांबळे यांना 8 लाख 80 हजार रुपयांची थैली सुपूर्द
डोंबिवली, दि. 07, मे - देशभरातल्या चित्र, शिल्प, नाट्य, नृत्य, गायन अशा कलेच्या सर्व क्षेत्रांना समावेशक अशी पंच्याहत्तर किलोमीटर लांबीची शिल्प भींत साकारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घ्यावयाचा आहे. येत्या 2022 ला देशाच्या पंचाहत्तरव्या स्वातंत्र्य दिनी तो प्रकल्प देशाला अर्पण करावयाची ईच्छा आहे असे वक्तव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी डों बिवलीत नवराष्ट्रचे प्रतिनिधी प्रशांत जोशी यांच्याशी केले.डोंबिवलीकर आर्ट सोसायटी माध्यमातून कलास्पर्श कार्यक्रमात मिळालेल्या मायेच्या प्रतिसादाने ते भारावून गेले होते. यावेळी ते पुढे म्हणाले, त्या दुर्घटनेमुळे असं वाटलं कि सर्व काही संपल पण त्यानंतर अनेकांचे सहकार्य आणि मिळालेली उभारी यामुळे आता पुन्हा खरी सुरुवात होत आहे.
व्यावसायिक काम करुन खूप कमविले पण आता देशासाठी वेगळे करावयाचे आहे. देशाच्या पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनी देशातल्या पाचशे कर्तृत्ववान देशवासीयांची पेन्सिल चित्रे सलग 70 मीटर क नव्हासवर रेखाटली होती. त्याचप्रमाणे आता आगळ्या वेगळ्या 75 किलोमीटर शिल्प भिंतीची निर्मिती करावयाची आहे. या भिंतीवर कला क्षेत्रातील सर्वसमावेशक कलांवर आधारीत शिल्पे तयार क रुन देशाला समर्पित करण्याची ईच्छा आहे.
आंतरराष्ट्रीय शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला अलीकडेच आग लागून संपूर्ण स्टुडिओ भस्मसाद झाला. या घटनेत त्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना सहकार्य म्हणून डोंबिवलीकर आर्ट सोसायटी माध्यमातून कालास्पर्श असा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कलाकारांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन कला अविष्कार सदर केले. नृत्यांचे सादरीकरण आ णि प्रसिद्ध चित्रकारांचे कॅन्हासवरील रेखाचित्रांचे षटकार असा दुग्ध-शर्करा योग या निमित्ताने डोंबिवलीकरांना आत्मसाद करता आला.
चित्रकार प्रकाश बाळ, सुलेखनकार अच्चुत पालव, शिल्पकार चंद्रजित यादव, चित्रकार विशाल वाडये, चित्रकार निलेश भारती आणि व्यंग चित्रकर निलेश जाधव यांच्या सप्तरंग छटांच्या ब्रशस्ट्रोकस हित विविध कलांचे स्थिरचित्रित अविष्कारात नृत्यांगना तल्लीन झाल्या होत्या. असा हा डोंबिवलीतील गोड कालास्पर्श शिल्पकार प्रमोद कांबळेना भविष्यात उभारी देणारा ठरला.प्रारंभी महापालिकेच्या सावित्रीबाई कलामंदिरात राज्यमंत्री तथा कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र चव्हाण, शिल्पकार प्रमोद कांबळे, सुलेखनकार अच्चुत पालव यांच्या हस्ते दिप्रज्वलन करून क ार्यक्रमाला प्रारंभ झाला.
नृत्यांगना वृषाली दाबके आणि सहकारी यांचा नृत्याविष्कार आणि डॉ प्रशांत सुवर्णा, डॉ मंदार कोरान्ने यांच्या गायकीला रसिकांनी भरभरून दाद दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश साने यांनी केले तर उपस्थित मान्यवर कलाकरांना चव्हाण आणि कांबळे यांचा हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.