पक्षी वाचवण्यासाठी संजय कोठारी यांची धडपड
सकाळी साडेनऊच्या दरम्यान कोठारी यांना एक फोन आला व एक बहिरी ससाणा जातीचा पक्षी पाण्याच्या शोधात असताना त्याचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला. कोठारी लगेच आपल्या मुलाला (रोहन ) सोबत घेऊन घटनास्थळी गेले परिस्थिती लक्षात घेऊन रोहन याने मोठ्या शिताफीने त्याला पकडून थोडे शांत करून घरी आणले, तेथे त्याला एका पिंजर्यात सुरक्षित ठेवले, वनाधिकारी व वनमजुर ताहेर सय्यद, दत्तात्रय गवसने, विष्णु राठोड, नितीन बांगर, राजु घुगे यांना बोलावून घेतले, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवार यांचे मार्गदर्शनाने त्यास पाणी पाजून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. फुन्ने यांच्याकडे नेवून तेथे त्यावर प्राथमिक उपचार करून त्याला शिरुर कासार येथील प्राणीमित्र सिध्दार्थ सोनवने यांच्या तागडगाव येथील वनजीवन पुनर्वसन केंद्राकडे नेवून पोहच केले. यावेळी रजनीकांत साखरे, रोहन कोठारी, राहुल राळेभात, अक्षय साखरे, सुमित बिश्वास यांनी मदत केल्याचे संजय कोठारी यांनी सांगितले.