यशवंत विदयार्थ्यांना पत्रकारांच्या हस्ते बक्षिस वितरण
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथिल संस्कार पब्लिक स्कूलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित बक्षिस वितरण समारंभात यशवंत विदयार्थ्यांना तालुक्यातील पत्रकारांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात श्रीगोंदा तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, नेत्रतज्ज्ञ डॉ. एकनाथ साळुंके, दीपक वाघमारे, पंकज गणवीर, रामदास कोळपे आदी उपस्थित होते. वर्षभर केलेल्या अभ्यासातून विशेष गुण प्राप्त केल्याबद्दल विदयार्थ्यांचा सुवर्णपदक, रौप्यपदक, कांस्यपदक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. इंग्रजी काळाची गरज ओळखून ग्रामिण भागातील सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून इंग्रजी माध्यमातील संस्कार पब्लिक स्कूलची स्थापना करून शालेय ज्ञानाबरोबरच व्यावाहारीक वा अवांतर ज्ञान प्राप्तीसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवत असल्याचे संस्थापक संजय कौठाळे यांनी सांगितले. आळसी डोळा व डोळ्याची निगा कशी राखाल यावर डॉ. साळुंके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विदयार्थ्यांसह पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सतिश सोनवणे यांनी, तर प्रास्ताविक सचिन खामकर यांनी केले.