Breaking News

आदिवासी भल्ल समाजाच्या नावे गायरान करा : मागणी

कोपरगाव शहर प्रतिनिधी  - कसत असलेले गायरान आदिवासी भल्ल समाजाच्या नावे करण्यात यावे, यासाठी समाजाच्यावतीने कोपरगाव तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. 

तालुक्यातील संवत्सर येथे तीन पिढ्यांपासून आदिवासी भिल्ल समाज राहत आहे. त्या भागांतील गायरान व फॉरेस्ट कसतो आहे. सदर समाज हा भूमिहीन असून त्यांना उपजिविकेचे दुसरे साधन नाही. त्यामुळे संवत्सर ग्रामपंचायतीने त्या जमिनी भिल्ल समाजाच्या नावे करण्याचा ठराव केला आहे. तसेच या समाजाने अनेक दशकांपासून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सदर गायरान मिळावे, यासाठी कागदोपत्री पाठपुरावा केला. आदिवासी एकलव्य भिल्ल समाजाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पवार यांनी तहसीलदार किशोर पवार यांना नुकतेच निवेदन दिले. या निवेदनावर राहुल सोनावणे, दशरथ गायकवाड, नाना गायकवाड, किशोर पवार, अशोक गायकवाड, सुनील गायकवाड आदींच्या सह्या आहेत.