Breaking News

‘श्रमिक’ला 'ज्ञानसमृद्धी पुरस्कार' प्रदान


संगमनेर : येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. वक्तृत्व, वादविवाद, निबंध आदी स्पर्धा दरवर्षी राज्यपातळीवर आयोजित केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून आयआयबीएम (इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट) या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातील ६३० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या संस्थेने विद्यार्थ्यांचे कौतुक करुन श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयास आयआयबीएम संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा 'ज्ञानसमृद्धी पुरस्कार' नुकताच प्रदान केला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अनिल राठी, प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, आयआयबीएम संस्थेचे विभागप्रमुख भागवत पाटील, ढेरंगे पुंडे, उपप्राचार्या मेधा शिरोडे, पर्यवेक्षक डॉ. शांताराम रायसिंग, पालक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस. एस. शिंदे यांनी केले. पर्यवेक्षक डॉ. शांताराम रायसिंग यांनी आभार मानले.