Breaking News

शहरात लवकरच ‘मटण मार्केट’ : वहाडणे


कोपरगाव : शहरातील सर्व प्रकारचे मटन विक्रेते, चिकन विक्रेते यांना एकाच जागेवर विक्रीसाठी दुकाने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी शहरात लवकरच ‘मटण मार्केट’ची निर्मिती करू, असे आश्वासन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिले. 

यावेळी नगरसेवक संदिप पगारे, आरिफ कुरेशी, संजय कांबळे, बाळासाहेब आढाव, फकिरजी कुरेशी, अल्ताफ कुरेशी आदींसह अन्य मटण विक्रेते उपस्थित होते. ते म्हणाले, शहरात विखुरलेले मटन, चिकन विक्रेते व ग्राहकांची चांगली सोय होऊन शहर स्वच्छतेला मदतच होईल. बैल बाजार परिसरात मटण, चिकन व मासे विक्रीसाठी हे मार्केट करण्याचा मानस आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.