Breaking News

हॉकी प्रशिक्षक कायम


नवी दिल्ली : नुकत्याच राष्ट्रकुल स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये निराश केलेल्या भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकांत बदल करण्यात आले असले, तरी २०२०च्याटोकियो ऑलिंपिकपर्यंत प्रशिक्षकांमध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाही, असा दावा हॉकी इंडियाने केला आहे. दरम्यान, प्रशिक्षक जोर्द मरिन यांच्यामार्गदर्शनाखाली खेळणारा पुरुषांचा हॉकी संघ १० वर्षे मागे पडल्याचे अनेक माजी हॉकीपटूंचे मत पडले. जवळपास ४३ विद्यमान आणि माजी खेळाडूंची मतेप्रशिक्षक बदलासाठी विचारात घेण्यात आली होती, असाही दावा हॉकी इंडियाने केला आहे.