उन्नाव बलात्कार प्रकरण : आ. सेंगरला वाचविण्यासाठी तपासात त्रूटी : सीबीआय
नवी दिल्ली/प्रतिनिधी : उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडीतेने आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्यावर केलेल्या आरोपाला केंद्रीय अन्वेषण विभागाने पुष्टी दिली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी सेंगरला वाचविण्यासाठी तपासात त्रूटी ठेवल्याचा धक्कादायक खुलासा सीबीआयच्या तपास अहवालात करण्यात आला आहे.
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. गेल्या वर्षी जून महिन्यात आमदार सेंगर आणि त्याच्या भावांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला होता. प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप करत पीडितेने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रकरण देशभरात चर्चेत आले होते. पीडितेवर अत्याचार आणि तिच्या वडिलांची हत्या प्रकरणात आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्याचा भाऊ अतुल सिंहसह इतर आरोपींवर गुन्हा दाखल आहे. तर शशी सिंहवर अत्याचाराच्यावेळी घराबाहेर पहारा देण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.