Breaking News

कर्नाटकात चंद्राबाबूंचा भाजपला ‘दे धक्का’ 40 जागांचे भवितव्य तेलुगू मतदारांच्या हाती


बंगळुरू/वृत्तसंस्था : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा तोफा थंडावल्या असून, आता अखेरच्या टप्प्यातील डावपेच आखण्यास सुरूवात झाली असून, कानडी मतदारांसोबत अन्य भाषिकांची मते या निवडणूकीत निर्णायक ठरणार आहेत, यासाठी तेलगु मतदार मोठया संख्येने असलेल्या 40 जागांचे भवितव्य या मतदारांवर अवलंबून असणार आहे, यासाठी तेलगु देसमचे चंद्राबाबू नायडू भाजपला दे धक्का देण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र आहे. तेलुगू हा कर्नाटकातील तिसरा भाषिक समूह आहे. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात 15 टक्के लोकसंख्या तेलुगू भाषिकांची आहे. कन्नड, उर्दूनंतर बोलली जाणारी तेलुगू जाणारी तिसर्‍या क्रमांकाची भाषा आहे. 224 जागांपैकी किमान 40 जागांवर तेलुगू भाषिक मतदारांचा प्रभाव आहे. कर्नाटकातील रायचूर, बेल्लारी यांच्या सीमा आंध्रशी जोडल्या गेल्या आहेत. कर्नाटकातील तुमाकुरू, चित्रदुर्ग, बल्लारी, कोप्पल, रायचूर, कोलार, बिदर, बंगळुरू मध्ये तेलुगू भाषिक मोठ्या प्रमाणावर आहे. गार्डन सिटी बंगळुरूमध्ये 25 लाख तेलुगू मतदार आहेत. व्यावसायिक, रिअल इस्टेट, हॉटेल, कामगार, सॉफ्टवेअर इंजिनिअर आंध्रप्रदेशातून येथे स्थिरावले आहेत. तेलुगू देसम पक्षाची एक टीम सध्या कर्नाटक निवडणूक प्रचारात सक्रिय आहे. सध्या सोशल मीडियावर तेलुगू देसम पक्षाची टीम सक्रिय आहे. पूर्ण क्षमतेने त्यांनी प्रचार सुरू केला आहे. व्हॉट्स अप, फेसबुक यांच्याव्दारे त्यांनी भाजपला विरोधी प्रचाराला गती दिली आहे. त्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदार मानल्या जाणार्‍या तेलुगू मतदार भूमिकेवर ठाम राहणार की अन्य पर्याय निवडणार हे 15 मे रोजी स्पष्ट होईल. 


चंद्राबाबूंचे धक्कातंत्र :
चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएमधून एक्झिट घेतल्यानंतर भाजपशी असलेले त्यांचे संबंध फिस्कटले आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटक निवडणुकीत मतदान करताना तेलुगू मतदारांनी विचार करावा. आंध्रप्रदेशवर अन्याय करणार्‍यांना मतदान करू नये, असे सूचक विधान मुख्यमंत्री नायडू यांनी केले होते.