जनकपूर-अयोध्येचे अतूट नाते : पंतप्रधान
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौर्यावर असून, शुक्रवारी त्यांनी जानकी मंदिरात दर्शन घेत पूजा-अर्चा केली. यावेळी त्यांनी मंदिरात पुजार्यांसोबत झालही वाजवली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत भारत-नेपाळचे अनेक उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
जनकपूर ही सीतेची जन्मभूमी आहे. प्रभू रामचंद्राबरोबर येथेच त्यांचे लग्न झाले होते. जनकपूर येथे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान केपी ओली स्वतः आले होते. यावेळी मोदी यांनी जनकपूर-अयोध्या या नव्या बस सेवेचेही उद्घाटन केले. तसेच जनकपूरला रामायण सर्किटलाही जोडण्याची घोषणा मोदी यांनी केली आहे. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मोदी म्हणाले, मला अभिमान आहे, की येथे येऊन मला माता सीतेची पूजा करण्याचे सौभाग्य मिळाले. मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याने जनकपूरमध्ये येऊन पूजा केली. मी नेपाळच्या पंतप्रधानांचे आभार मानतो. पर्यटनावर बोलताना मोदी म्हणाले, संपूर्ण जगात पर्यंटन वेगाने वाढत आहे. आपण दोन्ही देश एकत्रितपणे रामायण सर्किटच्या योजनेला पुढे नेत आहोत. ते म्हणाले, की माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, की ज्या यूपीच्या वारानसीने मला पंतप्रधान बनवले आणि त्याच युपीच्या अयोध्येला जनकपूर बस सर्व्हिस सुरू होत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी नेपाळमध्ये जनकपूर-अयोध्या (टीबीसी) नावाच्या एका बससुविधेच्या उद्घाटनासह रामायण सर्किटही लाँच केले. विशेष म्हणजे रामायण सर्किटचा 15 पर्यटन सथळांतही समावेश करण्यात आला आहे. रामायण सर्किट हे स्वदेश दर्शन योजनेंतर्गत 13 पर्यटन सर्किटपैकी एक आहे. धार्मिक पर्यटनाला उत्तेजन देण्याचा एक भाग म्हणून पर्यटन मंत्रालयाने रामायण सर्किटचा 15 पर्यटन स्थळांत समावेश केला आहे. यात केवळ अशिच ठिकाणे आहेत जेथेजेथे प्रभूरामचंद्र गेले होते. या दौर्यात मोदी आणि त्यांचे नेपाळमधील समकक्ष के. पी. ओली हे संयुक्तपणे हाइड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट अरुण 3 चे उद्घाटन देखील करण्यात आले.