काँगे्रस-जेडीएसचा सत्तास्थापनेचा दावा कर्नाटक विधानसभा निवडणुक; कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही
बंगळुरू/वृत्तसंस्था : कर्नाटक विधानसभा निवडणूकीत सुरूवातीपासूनच आघाडीवर असलेल्या भाजपच्या विजयाचा वारू 104 जागापर्यंतच उधळू शकला. तर काँग्रेसने 78 जागांवर विजय प्राप्त केला असून ते आणखी एका जागेवर आघाडीवर आहेत. म्हणजेच 78 जागा जिंकूण काँग्रेस हा दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. असे असले तरी या निवडणुकांमध्ये जेडीएसने 38 जागांवर विजय मिळवत किंग मेकरची भूमिका बजावली. त्यामुळे भाजपाचे एकहाती सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंगले आहे. तर दुसरीकडे काँगे्रसने जेडीएससोबत आघाडी केली असून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. मात्र राज्यात त्रिशंकु निकाल हाती आल्यामुळे कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेले नाही, तरी देखील भाजप पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून कर्नाटकात समोर आला आहे, मात्र काँगे्रसने जेडीएससोबत आघाडी केल्यामुळे सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने पाहणार्या भाजपला जबरदस्त हादरा बसला आहे. आज सुरु असलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीवरून सुरुवातीला भाजपचा वारू हा बहुमताचा जादुई आकडा पार करणार असे चित्र निर्माण झाले होते. कर्नाटकात ‘कमळ’ फुलण्याची शक्यता असल्याने भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्सुकता ही निर्माण झाली होती.एवढेच नाहीतर कर्नाटक निवडणूक निकालांचे कल पाहून भाजपने, सत्ता स्थापण्याच्या हालचालींनी वेग धरला होता. मात्र, विजयाकडे वाटचाल करणार्या भाजपला केवळ 104 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय जितका काँग्रेस व जेडीएसच्या जिव्हारी लागणारा आहे, तितकाच भाजपलाही अचंब्यात टाकणारा आहे. काँग्रेसच्या सिद्धारामय्या सरकारने निवडणुकीपूर्वी लिंगायत समाजास अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यामुळे मानले जात होते, की बीजेपीचा पारंपारिक मतदार समजला जाणारा लिंगायत समाजाचा मोठा हिस्सा काँग्रेसकडे आकर्षित होईल. परंतु आजच्या निकालाने हे समीकरण पुरते उलटली असल्याने दिसून आले. दक्षिण भारतात कर्नाटक वगळता भाजपला फारसे यश आलेले दिसले नाही. दक्षिणेत भाजपच्या हातात असलेले एकमेव राज्य कर्नाटकमध्ये देखील मागील विधानसभा निवडणुकीत येडीयुरप्पा यांच्या नेत ृत्वाखालील 2008 ते 2013 दरम्यान भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यावेळी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पहिल्यांदाच विजय मिळाला होता. यावेळी देखील भाजपने पुन्हा त्यांच्यावरच विश्वास टाकला. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर 6 दिवसांमध्ये तब्बल 21 सभा घेतल्या, भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी 27 सभा आणि रॅली घेतल्या होत्या.