रमेश कराडांचा अर्ज मागे; जगदाळे-धस यांच्यात होणार लढत धंनजय मुंडे पडले तोंडावर; बहिन भावावर भारी
बीड (प्रतिनिधी)- रमेश कराड यांनी अगदी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी आणि अर्धा तासाचा अवधी उरलेला असताना यू-टर्न घेत उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता वेगवगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. कराड कोणाच्या दबावाला बळी पडले, कोणाला घाबरले, की त्यांची ही पोलिटिकल गेम होती, याचे आखाडे बांधले जाऊ लागले आहेत. रमेश कराड हे गेली 13/14 वर्षापासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मंत्री पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ, अशी त्यांची दुसरी ओळखही होती.
विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर कराड यांनी रा.कॉ. मध्ये प्रवेश केला. त्यांना रा.कॉ. मध्ये आणण्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची शिष्टाई महत्त्वपूर्ण ठरली. मुंडे यांच्या शिफारशीवरूनच कराड यांच्या पदरात अलगद उमेदवारी पडली. उस्मानाबाद येथे सकाळी रा.कॉ. मध्ये प्रवेश आणि दुपारी उमेदवारीचा अर्ज दाखल क रून कराड यांनी झडपट आमदरकीचे स्वप्न पाहिले. मंत्री पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी मोठा धक्का दिल्याची चर्चा झाली. दोन्ही भावांनी राजकीय खेळी केल्याने हताश झालेल्या पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांचा अर्ज दाखल करताना ‘आता भविष्यात कोणाला भाऊ मानणार नाही’ असा निर्धार केला. सोमवारी मात्र कराड यांनी उमेदवारी मागे घेऊ न राजकीय भूकंपच घडवून आणला. त्यांनी नेमके असे का केले, याचा अंदाज बांधला जात असला तरी आता जेव्हा कराड स्वत:च यासंदर्भात स्पष्टीकरण देतील, त्यावेळी नेमके काय ते समोर येईल.
सध्या कराड यांना स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘पंक्चर’ केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी जादुची कांडी फिरविल्याची चर्चा आहे. रा.कॉ. च्या क ार्यकर्त्यांकडून शरद पवारांची ही खेळी मानले जात आहे. अशोक जगदाळे यांना पवार यांनी शब्द दिला होता, परंतु ऐनवेळी कराड यांना उमेदवारी दिल्याने स्वत: पवार नाराज होते, असेही काहीजण सांगताना दिसतात. काहीही असले तरी आता कराड यांच्या खेळीने राजकीय समिकरणे बदलली आहेत. एक मात्र खरे की रमेश कराड यांनी स्वत: उपरती होऊन अर्ज मागे घेण्याची सुतराम शक्यता नाही. यामागे वेगळेच राजकारण ‘शिजले’ असण्याची शक्यता आहे.