Breaking News

अवैध धंद्यांविरोधात निगडी पोलीस ठाण्यावर ’बाटली मोर्चा’

पुणे, दि. 08, मे - पिंपरी-चिंचवड शहरामधील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरोधात अपना वतन संघटनेच्या वतीने निगडी पोलीस ठाण्यावर बाटली मोर्चा काढण्यात आला. अवैध दारू धंदे बंद करा, हफ्तेवसुली करणा-या पोलिसांवर कारवाई करा, गुन्हेगारी थांबवा अशा घोषणा देण्यात आल्या. संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखाली अंकुश चौक ते निगडी पोलीस स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. तेथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यांनी निगडी पोलीस ठाण्याच्या स्टेशनच्या हद्दीतील सर्व अवैध दारू धंदे बंद केल्याचे सांगितले. काही ठिकाणी जर अवैध धंदे निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे. आम्ही तात्काळ कारवाई करू, असे लेखी आश्‍वासन दिले.

मोर्चामधये सिद्दीक शेख म्हणाले की, निगडी पोलीस हद्दीसह संपूर्ण शहरामधचंड मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली आहे. सर्वसामान्य जनता प्रचंड दहशतीखाली जगत आहे. तसेच शहरात काही भ्रष्ट पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारू धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. अवैध धंदेवाल्यापसून करोडो रुपयाचा हफ्ता वसूल केला जात आहे. काही रुपड्यांसाठी काही राजकीय पुढारी व काही भ्रष्ट पोलीस अधिकारी भारत देशाशी गद्दारी करत आहेत. या अवैध धंद्यांपासून महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. अनेक तरुण वाममार्गाला जाऊन गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. शहरामध्ये दरवर्षी दोन लाख तरुण दारूच्या आहारी जातात.