Breaking News

भ्रष्टाचारविरोधी संघटनेच्या जिल्हा कार्यालयचे पाडळी येथे उद्घाटन

पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी संघटनेच्या जिल्हा कार्यालय पाडळी येथे धर्मनाथ कचरे वायरमन तसेच माजी सरपंच यामाजीराव भिसे यांचेहस्ते उद्घाटन झाले. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण तुळशीराम जीवडे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वजीर शेख, तालुका संघटक महादेव ताठे, संपर्कप्रमुख संभाजी वांढेकर तसेच गावातील युवा नेते गणेश कचरे व देविदास कचरे त्याचबरोरबर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष जिवडे म्हटले की, गाव तेथे शाखा करण्याचा उप्रकम हाती घेतला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हनाले की, गाव तेथे जर संघटनेच्या शाखा झाल्या तर कोपर्डीसारख्या घटणेस आळा बसेल. भाऊसाहेब जिवडे, रामदास कचरे, नाना भोरडे, राहुल कचरे, दत्तात्रय कचरे, अजिनाथ कचरे, भारत कचरे, जालिंदर कांबळे, दीपक भोरडे, नाना गायकवाड, चंद्रकांत कचरे, अमोल कचरे, अप्पासाहेब कचरे, अमोल भोरडे आदींनी पुढील कामास शुभेच्छा दिल्या.