Breaking News

मायंबा गावात अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता

नाथसांप्रदायाचे विकसित रूप म्हणून वारकरी सांप्रदायाकडे पाहिले जाते. जातीधर्माच्या भिंती तोडून सामाजिक समता व विश्‍वबंधुत्वाची शिकवण वारकरी सांप्रदायाने दिली. नाथ सांप्रदायाची जन्मभूमी पाथर्डी तालुका असून या शिकवणीचे मूळ देखील तालुक्यात असल्याचे मत पंढरपूरच्या चारोधाम मंडळ ट्रस्टचे संस्थापक बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी व्यक्त केले. मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव व नवनाथ मंदिर मठ भूगाव यांच्या सयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर भव्य अखंड हरीनाम साप्ताह व नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा आयोजित केला होता. या सप्ताह सांगता प्रसंगी काल्याचे कीर्तनप्रसंगी बद्रीनाथ महाराज तनपुरे बोलत होते. देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, सरपंच राजेंद्र म्हस्के, अनिल म्हस्के, वसंत शेडगे, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पठाडे, शांताराम इंगवले आदी मान्यवर, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातील भाविक मोठ्या संखेने सप्ताह मध्ये सहभागी होते. या सप्ताहामध्ये काकडा भजन, नवनाथ पारायण, प्रवचन, हरिपाठ, मच्छिंद्रनाथ आरती, कीर्तनसह धर्मिक कार्यक्रम संपन्न झाले. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.