Breaking News

राज्यव्यापी अधिवेशनात सहभागी व्हा : शेळके


आश्वी : पुणे येथील प्रादेशिक परिवहन विभागाजवळील एसएसपी एमएसच्या मैदानावर रविवारी ( दि. २७) सायंकाळी ४ वाजता राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे पालकमंत्री नामदार गिरीष बापट, रिपाईचे राज्य अध्यक्ष भुपेश थुलकर आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी या अधिवेशनात सहभागी व्हावे, असे आवाहन रिपाईचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी केले. 
तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे राज्यव्यापी अधिवेशनानिमित्त आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खरात, संगमनेर शहर प्रमुख कैलास कासार, अँड. रविंद्र शेळके, सुनिल रुपवते, शुंभम रोकडे, सचिन खाडे, पप्पू गोडगे, पप्पू रोकडे, मधुकर सोनवणे, विजय खरात, राजु वाघमारे, शशिकांत रोकडे, रमेश भोसले, जनार्धन साळवे, विकास गायकवाड, शरद जमधडे, आत्माराम अंडागळे, मछिंद्र पवार, संपत भोसले आदी पदाधिकारांसह तालुक्यातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.