Breaking News

साई शताब्दी महोत्सव आणि अधिकमासानिमित्त पारायण


राहाता: साई समाधी शताब्धी वर्षानिमित्ताने येथील श्री साई स्नेहबंध ग्रुपने श्री साईचरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. या साईचरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याचे हे १७ वे वर्ष आहे. साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव व अधिकमास असा दुग्ध शर्करा योग आहे. या सोहळ्यास पारायणकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
साईबाबा व श्री विरभद्र देवतांच्या अभिषेक पुजनाने पारायण सोहळ्यास रविवारी {दि. २० } सकाळी प्रारंभ झाला. श्री साईंच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या राहाता नगरीमध्ये गेल्या १६ वर्षांपासून श्री साईस्नेहबंध ग्रुपच्यावतीने श्री विरभद्र मंदिराच्या सभामंडपात साईसचित्र ग्रंथ पारायाण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या पारायण सोहळ्यात महिलावाचंकासह २७५ साईभक्तांनी पारायण सोहळ्यात सहभाग घेतला. यात २३५ महिलांचा समावेश आहे. 

दरम्यान, बीड येथील ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांच्या काल्याचे किर्तनाने रविवारी {दि. २७} रोजी पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. प्रारंभी सकाळी शहरातून साईरथ व ग्रंथाची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राहाता व परिसरातील भाविकांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईस्नेहबंध ग्रुपचे अध्यक्ष गोकुळचंद पारख, कार्याध्यक्ष शंकरराव बाबर, उपाध्यक्ष अनिल जोशी आदींनी केले आहे.