Breaking News

.. तर मेजर गोगोईंवर करणार कारवाई : लष्करप्रमुख बिपिन रावत

नवी दिल्ली - मेजर लितूल गोगोई प्रकरणात लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली आहे. जर मेजर गोगोई दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे रावत यांनी म्हटले आहे. भारतीय सैन्यातील कोणीही कोणतेही गैरकृत्य केले असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल. जर मेजर गोगोईंनी काही चुकीचे केले असेल तर त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल, असेही गोगोई म्हणाले. काश्मीरमध्ये तरुणाचा मानवी ढाल म्हणून वापर करणारे मेजर गोगोई पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. एका 18 वर्षीय तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने बुधवारी गोगोई यांना हॉटेल कर्मचार्‍याने प्रवेश नाकारला आणि यावरुन वाद झाला. जम्मू काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. गोगोई यांनी हॉटेलमध्ये सोर्स मिटींगकरिता आलो असल्याचे चौकशीत सांगितले. गोगोई यांनी 2 जणांकरिता एका रात्रीसाठी हॉटेलमध्ये लितूल गोगोई या नावानेच बुकिंग केले होते.