Breaking News

सीबीएसई बारावीचा आज निकाल

हैदराबाद - केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभागातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी घोषित करण्यात येणार आहे. सीबीएसईचे शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी ही माहिती दिली. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्वरूप यांनी लिहिले, सीबीएसई बारावीचे वर्ष 2017-18 चे निकाल 26 मे राजी घोषित होतील.

निकाल बघण्यासाठी विद्यार्थी ललीशीर्शीीश्रीीं.पळल.ळप किंवा ललीश.पळल.ळप या संकेतस्थळांना भेट देऊ शकतात. यावर्षी बारावीच्या परीक्षेला देशभरातून 11.86 लाख विद्यार्थी बसले होते. देशभरातील 4138 केंद्रांमध्ये तर विदेशातील 71 केंद्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.