Breaking News

कुलाबा येथील आग आटोक्यात


मुंबई, दि. 13, मे - कुलाबा भागातील इलेक्ट्रिक हाऊसजवळील कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. आग लागण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने दुकान बंद असल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र या घटनेत आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.